सातार्यात कुरीयरवर दरोडा टाकून 22 तोळे सोन्याची लूट : एमपीतील दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Shirpur police arrest robbers who fled after committing a robbery in Satara शिरपूर (28 फेब्रुवारी 2026) : सातारा जिल्यातील सराफा कुरियरवर दरोडा टाकून पांढर्या कारमधून पसार झालेल्या सर्व दरोडेखोरांना शिरपूर शहर पोलिसांनी पाठलाग करून वाहनासह पकडले आहे. आरोपींनी 22 तोळे सोन्याची लूट करू कारने पळ काढला होता व संशयीत धुळे जिल्ह्यात येणार असल्याची शक्यता गृहित धरून सातारा एसपींनी धुळे एसपींना माहिती कळवली. धुळे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तातडीने जिल्ह्यात अलर्ट जारी केल्यानंतर आरोपींना पकडण्यात यश आले.
दरोडा टाकून लांबवले सोने
सातार्यातील न्यू लक्ष्मी कुरियर कंपनी मालक प्रमोद परमार (रा.सातारा), कुरियर बॉय कोमल परिहार (रा.सातारा) हे शुक्रवार, 27 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास सातारा शहराकडून मुंबई-पुण्याकडे जाणार्या महामार्गावर काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हाने सोने कुरीयरसाठी नेत असताना पाच इसमांनी 22 तोळे सोने दरोडा टाकून लूटत पांढर्या रंगाच्या कारने पळ काढला होता.


नाकाबंदीत अडकले आरोपी
धुळे अधीक्षकांच्या सूचनेनुसार शिरपूर पोलिसांनी नाकाबंदी लावली. पोलिसांकडे केवळ पांढर्या रंगाच्या कारचा एका बाजूचा काच फुटल्याची माहिती होती व त्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. तत्पूर्वी नाकाबंदी पाहून आरोपींनी टोल नाका चुकवुन शिरपूर गावातील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस पथकाला संशयीत स्विप्ट कार दिसल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढल्याने त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले.
अटकेतील आरोपींमध्ये अभिषेक सुरेंद्र शिकलबार (19, रा.गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), अंकुश जाट (19, रा.गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), अनुज रामाधर दिवाकर (19, रा.गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), पंकज केदार राठोड (19, रा.गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), अजय फौजदा राठोड (21, रा.गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दरवडे, हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ, विजय पाटील आदींनी केली.