चाळीसगावातील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना कलारत्न पुरस्कार प्रदान
Kala Ratna Award presented to painter and poet Dinesh Chavan from Chalisgaon चाळीसगाव (1 मार्च 2026) : नाशिक येथे नुकतेच 26 वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात भरगच्च साहित्यिक मेजवानी अनुभवण्यास मिळाली. कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन, प्रकट मुलाखत आदी साहित्यिक मेजवाणीसह विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या महाराष्ट्रभरातून अकरा गुणवंतांचा गौरव देखील यावेळी झाला. यात चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या कलाक्षेत्रातील अलौकिक कामगिरी बद्दल त्यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, जेष्ठ साहित्यीक पुंजाजी मालूंजकर, अलका दराडे, वजयंती सिन्नरकर, चंद्रकांत खाडे, सुभाष सबनीस, प्रमोद ठाकरे आदी उपस्थित होते.








