भुसावळ रेल्वे स्थानकावर दि.जैन यात्रेकरूंचा सत्कार
भुसावळ (1 मार्च 2026) : मुंबईहून शिखरजी यात्रेसाठी निघालेल्या विशेष रेल्वेचे भुसावळ स्थानकावर आगमन झाल्यानंतर शहरातील दि.जैन समाजाकडून यात्रेकरुंचे स्वागत करण्यात आले.
20 तीर्थंकरांची मोक्षभूमी
आचार्य भगवान श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या द्वितीय समाधी दिनानिमित्त, विद्या समय संस्कार सेवा फाऊंडेशन, मुंबई यांच्याकडून मुंबई ते शिखरजी यात्रेचे विशेष वातानुकूलित रेल्वेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्माच्या 24 पैकी 20 तीर्थंकरांची मोक्षभूमी असून जैन धर्मियांचे सर्वात पवित्र व मोठे शाश्वत सिद्ध क्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, पारसनाथ पर्वत हे ऐतिहासिक ठिकाण आहे.


आपल्या जीवनात पहिल्यांदाच शिखरजी यात्रा करणारे 1008 भक्त भाविकांना याचा लाभ झाला असून त्यात महिला, पुरुष व आबालवृद्धांचा समावेश आहे. संपूर्ण सात दिवसीय या धार्मिक यात्रेत, येण्या-जाण्यापासून जेवण, राहणे, खाणे व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक घडामोडींचा खर्च व आयोजन एका विशेष गुरुभक्त श्रावक परिवाराकडून गुप्त दान म्हणून करण्यात आला आहे.
या सत्कार व अनुमोदना समारोह करताना भुसावळ रेल्वे स्थानकावर भक्तांची मोठी गर्दी झाली. यात्रा आयोजन समितीचे प्रमुख कार्यकर्ते राजेंद्रजी सेठी व इतर पदाधिकारी सोबत, भुसावळ दि. जैन समाज चे अजय कासलीवाल , चेतन जैन हेमावत, शीतल जैन, आदिनाथ वास्कर, प्रदीप गोसावी, कुणाल वास्कर, जितेंद्र जैन, मीना जैन, अमोल वास्कर व ट्रस्टी बोर्ड भुसावळ यांची उपस्थिती होती.






