भुसावळातील भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
भुसावळ (2 मार्च 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून प्राचार्य राजू फालक होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले. विज्ञानामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो आणि विद्यार्थ्यांनी संशोधन व नवकल्पनांकडे वळावे, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा
या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः विज्ञान विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पना, पर्यावरण संरक्षण, अवकाश संशोधन इत्यादी विषयांवर आकर्षक व संदेशपूर्ण रांगोळ्या सादर केल्या. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमासाठी प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.कुंदा पेंढारकर यांनी सहकार्य केले.







