निंभोरा 132 केव्ही सबस्टेशनचा जळालेला ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणार ! आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश


रावेर (2 मार्च 2026) : निंभोरा येथील 132 केव्ही सबस्टेशनमधील 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्यामुळे परिसरातील अनेक गावांतील शेती पंप व गावठाण वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती.

या समस्येमुळे निंभोरा गावठाण, वडगाव गावठाण, खिर्डी -ॠ 11 केव्ही, विवरा -ॠ-3 11 केव्ही, बलवाडी, आंदलवाडी, सिंगत व खिर्डी परिसरातील शेती पंप फिडर तसेच गावठाण वीजलाइन बंद होत्या.



सदर गंभीर परिस्थितीची माहिती शेतकरी बांधवांनी स्थानिक आमदार अमोलभाऊ जावळे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत 132 केव्ही ट्रान्समिशन कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

आमदार जावळे यांच्या पाठपुराव्यानंतर ओझर येथून 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर लिफ्टिंग करण्यात आले असून तो आज रात्री निंभोरा येथे रवाना होत आहे. सदर ट्रान्सफॉर्मर उद्या दुपारपर्यंत निंभोरा 132 केव्ही सबस्टेशनमध्ये दाखल होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.

नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार असून शेती पंपांची वीज अडचण दूर होणार आहे.

या तातडीच्या कार्यवाहीमुळे शेतकरी व ग्रामस्थांकडून आमदार अमोल भाऊ जावळे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !