जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार


जळगाव (2 फेब्रुवारी 2026) : एका भागातील अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

भीती घालून अत्याचार
जळगावमधील राहणार्‍या एका 13 वर्षीय बालिकेला संशयित आरोपी दीपक कोळी याने आपल्या जाळ्यात ओढत 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान घरात कुणी नसताना आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तुझ्या पप्पांना मारून टाकीन, अशी भीती दाखवून त्याने पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.



केवळ अत्याचार करूनच आरोपी थांबला नाही, तर तो पीडितेला वारंवार फोन करून त्रास देऊ लागला. पीडित मुलगी शाळेत जात असतानाही तो तिचा रस्ता अडवून तिला भेटण्यासाठी सक्ती करत होता. अखेर या जाचाला कंटाळून आणि भीतीपोटी पीडितेने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

पीडितेच्या वडिलांनीदिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !