पोलिस अधिकारी असल्याची थाप : मुक्ताईनगरातील निवृत्त शासकीय कर्मचार्‍याला 18 लाखांचा गंडा


जळगाव (2 फेब्रुवारी 2026) : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’ आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मुक्ताईनगरच्या 71 वर्षीय निवृत्त शासकीय कर्मचार्‍याला तब्बल 18 लाख 21 हजार 827 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार मनोहर वसंत चौधरी (रा.कोथळी, ता.मुक्ताईनगर) यांना 17 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून फोन आले.

खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक
फोन करणार्‍यांनी स्वतःची ओळख राज मल्होत्रा ‘डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चा प्रतिनिधी, संदीप रॉय/राव याने वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. भामट्यांनी चौधरी यांना सांगितले की, त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे. भीती घालण्यासाठी संशयितांनी त्यांना व्हॉट्सपवर न्यायालयाचे बनावट आदेश आणि खोटे पोलीस कागदपत्रे पाठवले.



त्यांना अटक टाळण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या चौधरी यांनी 17 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी आरटीजीएस व एनएफीद्वारे एकूण 18 लाख 21 हजार 827 रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात वळते केले. सतत पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !