परसाडे जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांना पालकांची उत्स्फूर्त दाद


Parents’ spontaneous appreciation for cultural programs at Parsade Zilla Parishad School परसाडे (2 फेब्रुवारी 2026) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनासोबत वार्षिक बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी लोकनृत्य, विरांगणा झाशीची राणी यांच्या जीवनावरील गीत, देशभक्तीपर गीतांवरील नृत्य, विविधतेत एकता यात आपल्या देशातील विविध प्रांतावर आधारित नृत्य, मोबाईलचे दुष्परिणाम दाखवणारे गीत या कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विविध मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी परसाडे सरपंच मीना राजू तडवी होत्या. कठोरे केंद्रप्रमुख महंमद हबीब तडवी प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमास राजू तडवी, उपसरपंच सुलेमान तडवी, बाबासाहेब भालेराव, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाभाई तडवी, ग.स.सोसायटी जळगावचे संचालक योगेश इंगळे, भुसावळातील प्राथमिक शिक्षकांची पतपेढीचे चेअरमन प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापक उज्वला सोनार यांची देखील उपस्थिती होती.



मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
या कार्यक्रमात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चषक देण्यात आला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नथू तडवी, उपाध्यक्ष, सदस्य यांचे सहकार्य लाभले. कल्पना माळी यांनी सूत्रसंचालन केले. हसीना तडवी, अजित तडवी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !