भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात विज्ञान दिवस उत्साहात साजरा
Science Day celebrated with enthusiasm at K. Narkhede Vidyalaya, Bhusawal भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात विज्ञान दिवस साजर ाकरण्यात आला. विज्ञान दिवसाबद्दलचे व्याख्यान, सी.व्ही.रमण यांच्या जीवनाविषयीची माहिती, सामान्य ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेतील आठ ते दहा विद्यार्थ्यांनी डॉ.सी. व्ही. रमण यांच्याबद्दलची अतिशय उपयुक्त माहिती सांगितली.
शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्ध
शाळेच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल यांच्या संकल्पनेतून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येकी चार विद्यार्थी यानुसार पाच गट करण्यात आले व या स्पर्धेत वीस विद्यार्थी सहभागी झाले. अतिशय रंजक व चुरशीने ही स्पर्धा पार पडण्यााठी दोन फेर्या निश्चित करण्यात आल्या. ही स्पर्धा शाळेचे विज्ञान शिक्षक एस.पी.झांबरे यांनी पार पाडली. स्पर्धेसाठी ए.सी.फिरके, एम.एस.बोंडे, व्ही.सी.खडसे, विज्ञान विषय प्रमुख सी.डी.खडसे, एस.एस.तळेले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.


या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठक, तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दुपार सत्रात विविध कार्यक्रम
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांच्याहस्ते सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. पर्यवेक्षक एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी व्यासपीठावर उपस्थित होते .
विज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असल्याचे मत विद्यालयाच्या शिक्षिका एस.व्ही.जावळे यांनी विज्ञान दिनाची माहिती देताना सांगितले. आपण विज्ञान दिवस का ? व केव्हा? साजरा करतो हे विज्ञान शिक्षक एस.एस .कापसे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी उदय सपकाळे या विद्यार्थ्याने बंद पडलेले घड्याळ पूर्ण उघडून घड्याळाचे सर्व भाग व्यवस्थित लावून ते पुन्हा चालू करून दाखवले.
यावर्षीचा विज्ञान दिवस नाविन्यपूर्ण प्रकारे साजरा करण्याचे विद्यालयाने ठरवले म्हणून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा यात समावेश करण्यात आला. विविध मुद्यांवर आपले विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. एन.एस.पाटील, एच.एल.जंगले, एस.व्ही.जावळे, एस.बी.नेहते, व्ही.एम. महाजन, एन.व्ही.जावळे, एन.जे.पाटील, एस.एस.कापसे, बी.बी. जोगी, व्ही.एस.राणे या सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
विद्यालयातील विज्ञान शिक्षक एन.जे.पाटील यांच्या कल्पनेतून आजचा दिवस साकारला गेला. कार्यक्रमास संगणक विभागासह विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन इयत्ता नववी इ चा विद्यार्थी मधुर ठोसरे तर आभार बी.बी.जोगी यांनी मानले.







