भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात नैसर्गिक रंगाबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


Training of students on natural dyes at K. Narkhede Vidyalaya in Bhusawal भुसावळ (3 मार्च 2026) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात 2 रोजी खेलो ‘होली इको फ्रेंडली’ या कार्यक्रमांतर्गत ’नैसर्गिक रंग बनविणे’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक पदार्थांपासून म्हणजेच पालक, मेथी, हळद, बीट व कुंकू यासारख्या घरगुती पदार्थांपासून नैसर्गिक रंग कसे तयार करता येतील? याचे प्रत्यक्ष प्रयोग विद्यालयाचे उपशिक्षक डी.एम. हेलोडे यांनी करून दाखविले. या रंगाचे वैशिष्ट्य व उपयुक्तता यावर उत्तम मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी धुलीवंदन साजरा करण्यासाठी नैसर्गिक रंगच का वापरावे? व त्यांचे फायदे काय? यावर विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.




प्रशिक्षणासाठी के.नारखेडे विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे, वद्यालयाचे उपशिक्षक डी.एम.हॅलोडे, एस.पी.झांबरे, सी.डी.खडसे, एन.के.बावस्कर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !