भुसावळातील नक्षत्रा दलालचा पारितोषिकाने गौरव
Nakshatra Dalal from Bhusawal honored with award भुसावळ (3 मार्च 2026) : भुसावळ येथील ज्येष्ठ शिक्षण नेते प्र. ह.दलाल यांची नात व स्व.आशुतोष आणि वैष्णवी यांची कन्या कुमारी नक्षत्रा (पुरंध्री) हिने तिच्या सुरत (उधना) येथील मेरीमाता पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल तिला शाळेच्या उप प्राचार्य चित्रा यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
‘आईचा जोगवा’ ह्या महाराष्ट्रीयन गाण्यावर तिने साजेशी वेशभूषा करून ही नृत्य जोमाने सादर केले. यावेळी तिचे हावभाव, गाण्याला अनुरूप अशी भावमुद्रा, चपलपणा ह्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. नक्षत्रा ही चौथीची विद्यार्थिनी आहे.










