‘अंतर्नाद’च्या शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेतून होतेय शिवविचारांची रुजवात : आमदार अमोल जावळे
Shiva thoughts are being spread through ‘Antarnaad’’s Shiv Jayanti elocution competition: MLA Amol Javale भुसावळ (4 मार्च 2026) : विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांना विचारप्रवृत्त करत आमदार अमोल जावळे यांनी प्रभावी संवाद साधला. जिजाऊंनी शिवरायांना शिकवलेले तीन गुण कोणते? तसेच लोकप्रतिनिधींमध्ये असावेत असे शिवरायांचे चार आदर्श गुण कोणते? असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. स्पर्धांमध्ये भाग घेणे महत्त्वाचे 2असून हार-जीत ही सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव असते, मात्र त्या उणिवांवर सातत्याने काम केल्यास तीच उणीव पुढे जाऊन आपली स्ट्रेंथ पॉईंट ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. शिवरायांचे विचार आत्मसात करून ते जीवनात अंमलात आणण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. महावक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती, विचारशक्ती आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे नमूद करत युवकांच्या आत्मविश्वासवृद्धी व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘अंतर्नाद’चा हा उपक्रम प्रभावी व प्रेरणादायी ठरत असल्याचेही आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सांगितले.
स्पर्धेचे नववे वर्ष
अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे नववे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 479 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेची प्रथम फेरी 19 फेब्रुवारी रोजी पार पडली, तर अंतिम फेरी बक्षीस वितरणापूर्वी घेण्यात आली. पाच गटांतील 25 विजेत्यांसह सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा रविवारी अंतर्नादच्या 13 व्या वर्धापनदिनी सन्मान करण्यात आला.



यांची विचार मंचावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता युवराज लोणारी, इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, ग. स. सोसायटी जळगावचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, माजी नगरसेवक ड.बोधराज चौधरी तसेच फैजपूरचे नगरपालिकेचे गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे उपस्थित होते.
पाच गटात 15 विद्यार्थी सहभागी
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित महावक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच गटांमधील प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. एकूण 75 विद्यार्थ्यांची अंतिम फेरी रविवारी नहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये पार पडली. परीक्षक म्हणून शशिकांत झांबरे, दिनकर जावळे, निशा पाटील, रवींद्र पढार, विष्णू इतवारे, सिद्धेश देशपांडे, भाग्यश्री लोहार, अमित पाटील, संजय अंदूरकर, वर्षा सुरवाडे, जागृती खडसे, चेतना खडसे, विपीन वारके व ज्ञानेश्वर मोझे यांनी भूमिका बजावली.
48 परीक्षकांचाही सन्मान
अंतिम फेरी संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके बहुमान स्वरूपात प्रदान करण्यात आली. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल जीवन महाजन व शैलेंद्र महाजन यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देऊन सहपरिवार गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेतील 48 परीक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले, तर आभार प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन यांनी मानले. सन्मानपत्राचे वाचन अमितकुमार पाटील व विपीन वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, प्रकल्प सहसमन्वयक विक्रांत चौधरी, योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, हितेंद्र नेमाडे, समाधान जाधव, कुंदन वायकोळे, राजू वारके, मंगेश भावे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, अमित चौधरी, सचिन पाटील, हर्षा पाटील तसेच अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते
पहिला गट (इयत्ता 1 ली, 2 री)
प्रथम – आराध्या राजेंद्र सोनावणे (जि. प. प्राथ. शाळा, पाथरी)
द्वितीय – ओजवंती सुदाम पाटील (जि. प. प्राथ. शाळा, पाथरी)
तृतीय – श्रावस्ती नितीन सोनावणे (केंद्रीय विद्यालय, वरणगाव)
उत्तेजनार्थ – रोहन योगेश खरात (जि. प. प्राथ. शाळा, पाथरी)
द्वितीय गट (इयत्ता 3 री, 4 थी)
प्रथम – कार्तिकी निलेश पाटील (ओरियन सी.बी.एस.ई. स्कूल, जळगाव)
द्वितीय – प्राची संजय बढे (जिजामाता प्रा. वि., भुसावळ)
तृतीय – राजेश्वरी प्रदीप ठाकरे (जि. प. शाळा, रांजणी)
उत्तेजनार्थ – लक्षिता शैलेश माळी (सेंट अलॉयसियस शाळा, भुसावळ)
उत्तेजनार्थ – आराध्या गणेश पाटील (गुरुवर्य प. वि. पाटील शाळा, भुसावळ)
तृतीय गट (इयत्ता 5 वी ते 7 वी)
प्रथम – प्राजश्री विनोद कोळी (जि. प. शाळा, करंजी पाचदेवळी)
द्वितीय – भाग्यश्री भारत मस्के (रा. आ. महाजन माध्य. विद्या., हिवरखेडे)
तृतीय – काव्या आनंद फेगडे (ए. टी. झांबरे विद्या., जळगाव)
उत्तेजनार्थ – कोहिनूर हेमंतकुमार मोरे (इंदिराबाई ललवाणी मा. वि., जामनेर)
चतुर्थ गट (इयत्ता 8 वी ते 10 वी)
प्रथम – ओजस्विनी ज्ञानेश्वर मोझे (बहुउद्देशीय माध्य. विद्या., शेलवड)
द्वितीय – हुमांशी विक्रम सरोदे (नूतन माध्य. विद्या., चिनावल)
तृतीय – आश्लेषा राजेश्वर जोहरे (रा. आ. महाजन माध्य. विद्या., हिवरखेडे बु.)
उत्तेजनार्थ – चंचल वसंत गांगुर्डे (एन. पी. पाटील विद्या., पळासखेडे निराचे)
पाचवा गट (खुला गट)
प्रथम – रागिणी प्रमोद चौधरी (के. नारखेडे विद्या., भुसावळ)
द्वितीय – कुलदीप रविंद्र पाटील (माध्य. विद्या., बोरखेडा खुर्द)
तृतीय – धनश्री नंदकिशोर मेतकर (इंदिराबाई ललवाणी मा. वि., जामनेर)
उत्तेजनार्थ – वैष्णवी संतोष राऊत (इंदिराबाई ललवाणी मा. वि., जामनेर)







