अजितदादांच्या अपघातापूर्वी विमानतळाची रेकी ! : आमदार रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न


MLA Rohit Pawar मुंबई (4 मार्च 2026) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा अहवाल डीजीसीएकडून समोर आला असून आता या संदर्भात अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक प्रश्न उपस्थित केले. विमान अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती? असा आरोपी त्यांनी या संदर्भात क्रिमिनल अँगलने तपास करायला हवा, असे सांगितले. यावेळी त्यांनी नागरी उड्डाणमंत्री, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीचे मालक यांच्यातील जवळीकता यावरही गंभीर आरोप केले.

काय म्हणाले आमदार रोहित पवार ?
बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमिनल अँगलने तपास केला गेला पाहिजे, काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती मात्र अपघातापूर्वी रेकी झाली का ? याची आम्हाला पक्की माहिती नाही पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. याचा सखोल तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून केली. त्यासंदर्भात आमदार धनंजय मुंडे यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.




धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती? असा आरोपही त्यांनी केला. याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला असता, मला ते कसं करतात याची माहिती नाही. यासंदर्भात जे मांडत नाहीत, त्यांना अनुभव जास्त आहे. मी यावर बोलणं उचित नाही, असे मी समजतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिली आहे. मला याबाबतीत अधिक काही बोलायचं नाही, विश्वास-अविश्वास हे, बाकी जशा गोष्टी समोर आल्या तशा येतील. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं? नेमकं त्याला खरं की खोटं काय माहिती होतं, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.

रोहित पवार एव्हीगेशन एक्स्पर्ट : राणे
आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर, आता मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार आता एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत, तुमची माहिती फॉर्मल अ‍ॅथोरिटीकडे द्या, असे त्यांनी म्हटलं. रोहित पवार आता फक्त पायलट बनायचे बाकी आहेत, देशाचा कायदा रोहित पवार यांना माहीत आहे, असा टोलाच नितेश राणेंनी लगावला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !