साक्री तालुका हादरला : मुलीशी बोलण्याच्या वादातून झटापटीत एकाचा मृत्यू


Sakri taluka shaken : One dies in a fight over a dispute over talking to a girl साक्री (5 मार्च 2026) : पुतणीशी का बोलला या वादातून झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला असून संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. मयत दत्तु सोमा गवळी (35, रा.हनुमंत पाडा, पोस्ट राईनपाडा) असे मृताचे तर किसन गुलाब साबळे (22, हनुमंत पाडा, पोस्ट राईनपाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना ?
पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत मयत व संशयीत हे हनुमंतपाडा, पोस्ट राईनपाडा येथे वास्तव्याला आहेत. संशयीत किसन साबळे हा मयत दत्तू गवळी यांच्या 20 वर्षीय पुतणीशी बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बोलत असताना त्याचवेळी गवळी यांनी हटकले व मी जावून येतो त्या आधी तू येथून निघून जा, असे बजावल्यानंतर काही वेळेनंतर संशयीत दुकानावरच थांबून असल्याने उभयंतांमध्ये शाब्दीक वाद झाले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दत्तू गवळी हा जमिनीवर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पिंपळनेर पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेत संशयीत किसन साबळे यास ताब्यात घेत त्याच्याविरोधात पिंपळनेर पोलिसात बीएनएस 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !