बामणोदजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात : विरोद्यातील श्रीराम ट्रेडींगचे संचालक ठार


Accident between two bikes near Bamanod: Director of Shriram Trading in Virodya killed यावल (5 मार्च 2026) : दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने झालेल्या अपघातात यावल तालुक्यातील विरोदा येथील श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले (46 वर्ष) यांचा मृत्यू झाला. हा अपघात फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील बामणोदजवळील रईस हॉटेल समोर सोमवार, 2 मार्च रोजी रात्री सुमारे साडे दहा वाजता घडला.

समोरा-समोर धडकल्या दुचाकी
युवराज कपले हे बामणोद येथून कर्णछेदनाचा कार्यक्रम आपटून परतीच्या मार्गावर असताना भरधाव वेगाने येणार्‍या दुसर्‍या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने यात युवराज कपले यांच्या डोक्याला जबर मार लागला व ते गंभीर झाले. अपघतानंतर गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारार्थ भुसावळातील खाजगी रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




घटनास्थळावर असलेली अज्ञात व्यक्तीची दुचाकी (विना नंबर प्लेट एव्हेंजर लाल रंग) अज्ञात व्यक्तीकडून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली असून भुसावळ येथून दवाखान्यातून येत असलेल्या गावकर्‍यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी असलेल्या अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसात जमा केल्या.

होळीच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर कपले परिवार दुःखाचा डोंगर कोसळला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. अपघाताने विरोदा गावात शोककळा पसरली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !