भुसावळातील रेल कामगार सेनेतर्फे डीआरएम कार्यालयात उद्या शिवजयंती


भुसावळ (5 मार्च 2026) : शहरातील डीआरएम कार्यालयात रेल कामगार सेना भुसावळ मंडळातर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवार, 6 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत यांच्या प्रेरणेने मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्यासह डीआरएम कार्यातील विविध अधिकार्‍यांची उपस्थिती राहणार असल्याचे रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा, मंडळ सचिव राजेश लखोटे, मंडळ कार्याध्यक्ष प्रीतम टाक, मंडळ सचिव विनोद वाघे, मंडळ कोषाध्यक्ष योगेश माळी यांच्यासह सर्व मंडळ शाखा पदाधिकारी यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे. सर्व रेल्वे कर्मचारी तसेच अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !