भुसावळातील प्रतिष्ठा मंडळातर्फे महिलादिनी थोर महिलांच्या जीवनावरील सजीव देखाव्यांचे होणार सादरीकरण
Pratishtha Mandal in Bhusawal will present live scenes from the lives of great women on Women’s Day भुसावळ (6 मार्च 2026) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, 8 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये भारतीय इतिहासाला प्रेरणादायी ठरलेल्या थोर महिलांच्या जीवनावर आधारीत सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
थोर महिलांच्या जाज्वल्य इतिहासाचे सादरीकरण
भारतीय इतिहासाला प्रेरणादायी ठरलेल्या राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चिन्नमा, सावित्रीबाई फुले, अंतराळवीर कल्पना चावला आदींच्या जीवनावर या कार्यक्रमात सजीव देखाव्यातून स्थानिक कलावंतांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अनेक थोर पुरुषांसह थोर महिलाही होऊन गेल्या. विविध क्षेत्राच्या माध्यमातून कर्तृत्ववान थोर महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे व त्यांच्या कार्याची माहिती पुन्हा समोर यावी या उद्देशाने महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.






प्रतिष्ठा महिला मंडळाने उमटवली छाप
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यापूर्वी विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव, दुचाकी रॅली, विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांचे मार्गदर्शन, महिलांसाठी उद्योजक मेळावा आधी कार्यक्रमातून प्रतिष्ठा महिला मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रक्तदान शिबिरासह फूड स्टॉल लागणार
महिला दिनाचे औचित्य साधून याच कार्यक्रमात रक्तदान शिबिर तसेच कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे फूड स्टॉलही लावण्यात येणार असून भुसावळकर नागरिकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.







