शिवज्योत घेऊन धावणार्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू
Two Shiva devotees running with Shiva Jyot die in a horrific accident पुणे (6 मार्च 2026) :शिवज्योत घेऊन धावणार्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाल. गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ही दुर्घटना घडली. विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणार्या दोन तरुणांना भरधाव कारने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवजयंतीचा उत्साह क्षणात शोकात बदलला आहे.
शिवज्योत आणताना गाठले मृत्यूने
मृत्यू झालेल्या तरुणांची ओळख ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी झाली आहे. दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन आपल्या शिंदेवाडी या गावी परतत होते. ाात्री उशिरा हे दोघे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात पोहोचले. तेव्हा अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारने नियंत्रण गमावत दुभाजक ओलांडला आणि सरळ या दोघांवर धडक दिली.






दोघा शिवभक्तांचा जागीच मृत्यू
प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार अतिशय वेगाने येत होती. चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुभाजक तोडून कार थेट शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनवर आदळली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.







