पाल गावात भर दिवसा कृषी दुकानातून 50 हजारांची रोकड लांबवली
रावेर (5 मार्च 2026) : रावेर तालुक्यातील पाल येथे नामांकित कृषी केंद्रात भरदिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली. तीन अनोळखी इसमांनी संगनमताने ‘दिक्षा कृषी केंद्रा’च्या काउंटरमधील ड्रॉवरमधून 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी बुधवार, 5 मार्च रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
पाल गावातील रहिवासी गणेश मानसिंग पवार (33) यांचे ‘दिक्षा कृषी केंद्र’ नावाचे दुकान आहे. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गणेश पवार त्यांच्या दुकानात असताना तीन अनोळखी इसम तिथे आले. या तिघांनी फिर्यादीचे लक्ष विचलित केले.









