राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील ग्रंथपाल डॉ.विनोद भंगाळे यांचे उल्लेखनीय यश

‘आठवणीतील कविता : जुन्या नव्या’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय गौरव!


भुसावळ (6 मार्च 2026) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 1070 नवोपक्रम सादर करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील विविध अभिनव कल्पना, उपक्रम व प्रयोगशील प्रकल्प यांचा समावेश या स्पर्धेत होता. या स्पर्धेमध्ये भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.विनोद तुकाराम भंगाळे यांच्या अभिनव उपक्रमास राज्यस्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

सात गटात स्पर्धा
ही पर्धा सात गटात विभागण्यात आली. प्रत्येक गटातून उत्कृष्ट अशा 10 प्रकल्पांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व नवोपक्रमांची अधिकृत पुस्तिका तयार करण्यात येणार असून त्यामध्ये एकूण 70 प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे. डॉ. कमलादेवी आवटे, सह संचालिका यांच्याहस्ते डॉ. भंगाळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. हेमंत वसेकर संचालक, डॉ. इब्राहिम नदाफ, विभाग प्रमुख, डॉ दत्तात्रेय थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.



गुणवत्ता वाढीसाठी डॉ.भंगाळे यांचे योगदान
डॉ.भंगाळे यांच्या उपक्रमाने शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे परीक्षकांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर देते. या अनुषंगाने विविध शाळांमध्ये राबविल्या जाणार्‍या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा, विभाग स्तरावर सादरीकरण केल्यानंतर राज्य स्तरावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाते. या स्पर्धेत सात गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

डॉ.विनोद भंगाळे यांच्या या यशामुळे संस्थेचा व जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव वाढला असून शिक्षण क्षेत्रात नवोपक्रम राबविणार्‍या शिक्षकांसाठी हा प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.भंगाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
डॉ.विनोद भंगाळे यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, सेक्रेटरी पी. व्ही पाटील ऑन. जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, भाग्येश नारखेडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व संगणक विभागातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !