कृउबाचा आडमुठेपणा : वरणगावात लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंचे नगरसेवकांचे उपोषण
Kruuba’s stubbornness: Corporators of the publicly appointed mayor Sunil Kale in Varangaon go on a hunger strike वरणगाव (6 मार्च 2026) : वरणगावातील प्रभाग क्रमांक 8 प्रतिभा नगर, गंगाराम कॉलनीत पाणीपुरवठा योजनेची पाईप टाकली जात असताना कृउबाने आडमुठेपणा केल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रकारानंतर प्रशासनात धावपळ उडाली व पाच तासांनी कामाला सुरूवात करण्यात आली.
काय आहे नेमके प्रकरण ?
वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून पिण्याची पाईप लाईन पाच फूट खोल करून टाकू देण्यासाठी शुक्रवार, 6 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काम सुरू करण्यात आले मात्र कामाला विरोध करण्यात आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी धाव घेतली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एस.एन.दाभाडे, एस.आर.लोखंडे, उपनगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेवक नाना चौधरी, इरफान खाटीक, शुभम जावळे, मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, प्रकाश गव्हाळे, कदीर सेठ पठाण, सभापती योगेश पाटील, किशोर भंगाळे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.


उपोषणाची दखल : पाच तासांनी कामाला सुरूवात
यावेळी पाईप लाईन टाकण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने विरोध केल्यावर लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक नाना चौधरी, इरफान खाटीक, शामराव धनगर, आकाश निमकर, मुस्लिम अन्सारी, राहुल जंजाले, मिलिंद भैसे, योगेश माळी, जनसेवक कुंदन माळी, साबीर भाई कुरेशी, फहीम शेख, विजय वाघ यांनी भर उन्हात उपोषण सुरू केले. नागरिकांनी रस्त्यावर बसून आंदोलने सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली व पाच तासांनी अखेर कामाला सुरूवात करण्यात आली.







