धुळ्यासह मालेगावातून आठ दुचाकी लांबवल्या : चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Eight two-wheelers seized from Malegaon including Dhule : Thieves in the net of Crime Branch धुळे (6 मार्च 2026) : धुळ्यासह मालेगावातून महागड्या दुचाकी लांबवणार्या धुळे व मालेगावातील दोन चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून तीन लाख 10 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दोन दुचाकी धुळ्यासह मालेगावातील आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतून लांबवल्याचे स्पष्ट झाले असून सहा दुचाकींबाबत आरटीओ विभागाकडून माहिती काढण्यात येत आहे.
धुळ्यासह मालेगावातील आरोपीला अटक
धुळ्यातील आझादनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा (गु.र.नं.213/2025) गुन्हा दाखल असताना समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार करीत असताना त्यांना चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. पथकाने शाहीद अख्तर मोहम्मद सफर अन्सारी (26, रा.ग.नं. 7, सुल्तानिया चौक, जे. बी. रोड, धुळे अ) व शेख मोब्बीन शेख रहीम (26, रा.सलीम मुन्शी नगर, वस्ती नं.1, मालेगाव) यांना पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्सचे पाठीमागी बाजुस जाणार्या रोडवरुन ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी धुळे, मालेगाव शहरसह परिसरातील भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून एकूण तीन लाख दहा हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींमध्ये स्प्लेंडर, पल्सर, वायझेडएफ, केटीएम 200, पॅशन प्रो आदी वाहनांचा समावेश आहे.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेशी व प्रकाश सोनार आदींच्या पथकाने केली.







