धुळे कारागृहातून पसार झालेल्या आरोपीला पिंपळगावात पकडले


Accused who escaped from Dhule jail caught in Pimpalgaon धुळे (7 मार्च 2026)  : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी धुळे जेल पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडल्यानंतर भिकन पिंजारी (54, रा.निफाड, जि.नाशिक) विरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पसार कैदी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाणे हद्दीत आल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेत त्यास अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण ?
भिकन नजीर पिंजारी (55) या कैद्याविरोधात पिंपळनेर पोलिसात सी.आर. क्रमांक 89/2017 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 302 व 363 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असून त्यास 30 एप्रिल 2022 रोजी निफाड न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पिंजारी यास शिक्षेनंतर धुळे कारागृहात हलवण्यात आल्यानंतर त्यास गुरुवारी सकाळी कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेतीकामासाठी नेमण्यात आल्यानंतर संशयीताने जेल पोलिसांची नजर चुकवून पळ काढला होता. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला व संशयीत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती तपासाधिकारी उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत आरोपीला अटक करीत ताब्यात घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !