ग्रामीण भागातील हालचालीवर नजर ठेवाः पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर

यावल पोलिस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक


Keep an eye on the movement in rural areas: Deputy Superintendent of Police Anil Badgujar यावल (7 मार्च 2026) : पोलिस पाटलांनी पोलिसाचे नाक, कान, डोळे म्हणून ग्रामीण भागात काम करावे. ग्रामीण भागातील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवावी व कुठेच अनाधिकृतपणे पुतळे उभारणे किंवा स्मारक बांधकाम कुणी करत असेल तर तातडीने त्याची माहिती पोलिस प्रशासना द्यावी,. अशा सूचना डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी पोलिस पाटलांना केल्या. ते यावल पोलिस ठाण्यात गुरूवारी पोलिस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

अनधिकृत पुतळा उभारला जात असल्यास माहिती द्यावी
यावल पोलिस ठाण्यामध्ये पोलिस पाटलांची बैठक बोलावण्यात आली. गुरुवारी घेण्यात आलेल्या या बैठकीत फैजपूर विभागाचे डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी पोलिस पाटलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, ग्रामीण भागाच्या हालचालीवर प्रत्येक पोलिस पाटलाचे लक्ष असले पाहिजे, त्याचप्रमाणे कुठे जर अनाधिकृतपणे पुतळा उभारणे, स्मारक बांधकाम केले जात असेल तर त्याची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी. काही गावात अनधिकृतपणे पुतळे व स्मारक बांधून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे कटकारस्थान काही मंडळी करत असल्याचे समोर आले आहे.



आपल्या गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस पाटलांवर पण तितकीच आहे. त्यांनी पोलिसांचे कान, नाक, डोळे बनून गावात कामकाज करावे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे सह तालुक्यातील सर्व पोलिस पाटील हजर होते. याप्रसंगी ग्रामीण भागातील हालचाली, विविध धार्मिक कार्यक्रम यांची माहिती या बैठकीतून घेण्यात आली. व आगामी काळात नियोजित विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रम याची माहिती देखील प्रसंगी पोलिस पाटलांकडून जाणून घेण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !