नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या
Famous Ayurvedic doctor Manisha Jejurkar commits suicide in Nashik नाशिक (7 मार्च 2026) : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आह.े प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
राहत्या घरी केल आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. घरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.


डॉ.मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात परिचित नाव मानल्या जात होत्या. अनेक वर्षे त्यांनी रुग्णसेवा करत वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांचे पती डॉ.नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांच्या कुटुंबात अशी घटना घडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
दरम्यान, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपासाच्या अनुषंगाने विविध बाबींची चौकशी केली जात आहे. कुटुंबीय, शेजारी तसेच परिचितांकडून माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.







