यावल-बोरावल रस्त्यावर दुचाकी अपघातात पिंप्रीतील तरुण ठार


Youth from Pimpri killed in bike accident on Yaval-Boraval road यावल (8 मार्च 2026) : यावल शहरातून बोरावल जाणार्‍या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात घडला. या अपघातामध्ये पिंप्री येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीन राजू भोई (39, रा.पिंप्री) असे मयत तरुणाचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
यावल शहरातून बोरावल जाणार्‍या रस्त्यावर हाजी शब्बीर खान यांच्या शेताच्या जवळील वळणावर दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डब्ल्यू. 3271) वरुन नितीन राजू भोई (39, रा.पिंप्री, ता.यावल) हा जात असताना दुचाकी घसरली आणि अपघात घडला. या अपघातामध्ये नितिन भोई गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत नागरिकांच्या मदतीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात पोलिस पाटील रोहिदास कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !