भरधाव पिकअपच्या धडकेने सावदा-पाल मार्गावर दुचाकीस्वार ठार


Biker killed after being hit by speeding pickup on Savda-Pal road सावदा (8 मार्च 2026) : रावेर तालुक्यातील सावदा ते पाल दरम्यान असलेल्या पाल घाटात एका अज्ञात बोलेरो पिकअपच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चालकाविरोधात गुन्हा
बुधवार, 4 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमोल चव्हाण आणि बिस्मिल्ला तडवी (रा.पाल, ता.रावेर) हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.19 डी.एक्स.4766) सावदा-पाल मार्गावरून जात असताना . पाल घाटातील खिरोदा फॉरेस्ट नाक्याजवळील वळणावर मागून येणार्‍या एका भरधाव अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोन्ही दुचाकीस्वार खाली कोसळले. यामध्ये बिस्मिल्ला तडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला.



अपघाताबाबत मनीष धनराज चव्हाण (38, रा.पाल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल सिराज तडवी करत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !