रुईखेडे माध्यमिक विद्यालयात एक दिवसीय विज्ञान कार्यशाळा
One-day science workshop at Ruikhede Secondary School मुक्ताईनगर (8 मार्च 2026) : मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने एक दिवसीय विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रशेखर बढे यांच्याहस्ते झाले. या कार्यशाळेसाठी प्रमुख वैज्ञानिक मार्गदर्शक म्हणून सुशांत प्रभाकर जगताप उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते सरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
शिक्षिका योगीता झांबरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला. जगताप यांनी विज्ञानातील विविध संकल्पना, खगोलशास्त्रातील ग्रह-तारे, तसेच काही जादूचे प्रयोग करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आभार शिक्षिका योगीता झांबरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद शशिकांत सोनवणे, संदीप चौधरी, बबिता तडवी, साखरे, पी.टी.सावकारे आदींनी विशेष सहकार्य केले.









