वासुदेव जेष्ठ नागरिक संघातर्फे आभा व आयुष्मान कार्ड वाटप
Distribution of Abha and Ayushman cards by Vasudev Senior Citizens Association भुसावळ (8 मार्च 2026) : भुसावळ शहरातील वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेष्ठ सभासदांसाठी आभा कार्ड व आयुष्मान कार्ड वाटप तसेच रेशन कार्डच्या 12 अंकी नंबरसाठी नोंदणीचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उपक्रम
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाचे संयोजक डॉ.नितु पाटील यांनी हा उपक्रम राबविला. मागील दोन शनिवार सभासद नोंदणी, कागदपत्रे तपासणी केली असून उपस्थित जेष्ठ सभासदांना आभा कार्ड व आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात आले. तसेच अनेक नागरिकांच्या रेशन कार्डवरील 12 अंकी नंबरसाठी नोंदणीची प्रक्रिया देखील करण्यात आली.


यावेळी डॉ. नितु पाटील यांनी सर्व सभासदांना याविषयी सखोल माहिती देत त्यांच्या विविध आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली. या उपक्रमाचे महत्त्व सांगताना जेष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस संघाने व्यक्त केला. यशस्वीतेसाठी संघाचे पदाधिकारी प्रकाश पाटील,सतीश जंगले, धनराज पाटील,गणेश सरोदे, भानुदास पाटील, संजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा
आभा कार्डमुळे नागरिकांचे सर्व आरोग्य रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात.आयुष्यमान कार्डमुळे गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. देशातील आरोग्यसेवा जलद, सुरक्षित, डिजिटल आणि आधुनिक बनवण्यात या कार्डांची मोठी भूमिका असल्याचे वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघ संयोजक डॉ.नितु पाटील म्हणाले.







