भुसावळातील यावल रोड उद्यापासून अतिक्रमणमुक्त होणार ! पालिकेने बजावल्या नोटीसा


Yaval Road in Bhusawal will be encroachment-free from tomorrow! Municipality issues notice भुसावळ (8 मार्च 2026) : पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शहराजवळील अकलूद शिवारात 10 पासून श्री शिव महापुराण कथेला सुरूवात होत आहे. या अनुषंगाने आठ ते दहा लाख भाविक भुसावळातून कथा स्थळी जाण्याची शक्यता गृहीत धरता यावल रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यावर पालिकेने भर दिला आहे. यावल रोडवरील 60 हून अधिक व्यावसायिकांनी येत्या सोमवारपर्यंत हातगाड्या, टपर्‍या उचलून घेण्याचे आदेश मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिले आहेत. व्यावसायीकांनी अतिक्रमण न हटवल्यास सोमवारी सायंकाळी पालिका व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रस्ता घेणार मोकळा श्वास
यावल रोडवर सर्वदूर व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला टपर्‍या, हातगाड्या तसेच दुकाने लावण्यात आली आहे. शिवपुराण कथेच्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची होणारी गर्दी पाहता रस्ता अरुंद झाल्याने पालिकेने अतिक्रमण हटवण्यावर भर दिला आहे. सोमवारपर्यंत अतिक्रमण न हटवल्यास कारवाई केली जाणार आहे.



तर सोमवारी रात्री कारवाई
सोमवारी रात्रीनंतर रस्त्यावर दिसणारे साहित्य, हातगाडघा, टपर्‍या पालिकेच्या पथकामार्फत जप्त केल्या जातील. पाडळसे – अकलूद शिवारातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस दलाचा अतिरिक्त ताफा तैनात राहील, कथास्थळी पोलिस नियंत्रण कक्ष तयार केला जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !