विद्यार्थ्याला विवस्त्र कॉल करीत सहा लाख रुपये उकळले
Student was extorted Rs 6 lakh by making nude phone calls जळगाव (8 मार्च 2026) : व्हिडिओ कॉलद्वारे 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा विवस्त्र व्हिडिओ करून ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून पाच लाख 95 हजार 450 रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 5 सप्टेंबर ते 21 डिसेंबर 2025 या दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात 5 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
चाळीसगावातील 19 वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. 5 सप्टेंबर रोजी तो फेसबुक पाहत असताना त्याने ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा’ अशा मेसेजला क्लिक केले. त्यानंतर एक अॅप ओपन झाले व त्यात मुलींच्या नावाचे वेगवेगळे खाते दिसले.


यापासून वाचायचे असल्यास व्हिडिओ डिलिट करण्यासाठी डिलीट कार्ड लागेल व त्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार घाबरून सदर विद्यार्थ्याने समोरील व्यक्तीने पाठविलेल्या पेमेंट लिकवर वेळोवेळी एकूण पाच लाख 95 हजार 450 रुपये पाठविले.
विशेष म्हणजे ही रक्कम विद्यार्थ्याने चाळीसगावस्थित वडिलांच्या बँक खात्यातून ट्रान्सपर केल्याने काही दिवसांनी हा प्रकार त्याने घरी सांगितला. यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली व फसवणूक करणारी महिला तोतया पोलिस अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.







