अजितदादांच्या विमान अपघानंतर सुनेत्रा पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती


पुणे (8 मार्च 2026) : स्व.अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत विविध चर्चा सुरू असतानाच त्यांचे पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री
पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबतही सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवारांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, राज्यसभा हे देशातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्यांचे सभागृह आहे. राज्यसभा हे उच्च आणि अनुभवी लोकांचे सभागृह आहे. त्यामुळे तिथे काम करताना सर्वप्रथम सभागृहाची कार्यपद्धती, नियम आणि परंपरा समजून घेणे महत्त्वाचे असते. पार्थ पवार हे या सर्व गोष्टी शिकून घेतील आणि नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.



 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !