भडगावात खळबळ : मुलांना वाचवताना गिरणा पात्रात बुडून दोघांचा मृत्यू


Excitement in Bhadgaon : Two die after drowning in a water tank while saving children भडगाव (8 मार्च 2026) : भडगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मुलांना वाचवण्यासाठी गिरणा पात्रात उडतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार, 8 रोजी घडली. नदीम खान नसीम खान (27) व काफिया शरीफ पिंजारी (16) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार करण्यात आल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी करीत अवैध उत्खननावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

अधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली. नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.




दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !