संतापजनक : 21 वर्षीय विवाहित तरुणीची एका महिन्यात तीन वेळा विक्री
21-year-old married woman sold three times in one month बीड (8 मार्च 2026) : 21 वर्षीय विवाहित तरुणीची एकाच महिन्यात तीन ठिकाणी विक्री करून जबरदस्तीने तीन वेळा लग्न लावून दिल्याचा संताापजनक प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेनं विष पिऊन आत्महत्येचाा प्रयत्न केला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मानवी तस्करी करणारं रॅकेट असल्याचं साांगितलं जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
लालसेपोटी मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. लातूर येथील एका 21 वर्षांच्या तरुणीचं दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये एका तरुणासोबत लग्न लावून दिलं होतं. पण, पीडितेच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आल्याने पीडीता माहेरी राहण्यास गेली होती. पीडित तरुणीच्या आजी-आजोबाचं निधन झाल्याने ती निराधार झााली. शेजारी राहणार्या एका महिलेनं पुण्यात एका एजंट ओळखीचा आहे, तुझं दुसरं लग्न लावून देते, असं आमिष दाखवलं.



पीडित तरुणीचा मांडला लिलाव
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा या पीडितेला एंजटकडे नेण्यात आलं. तेव्हा त्यांनी तिचा अक्षरश: बाजार मांडला. पुण्यातील महानंदाने एजंटने कात्रजमधील एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेऊन जबरदस्तीने लग्न लावून दिलं. त्यानंतर ही पीडित तरुणी कात्रजमध्ये 10 दिवस राहिली. हा प्रकार इथंच थांबला नाही. त्यानंतर तिला कुरक्षेत्र इथं एका माणसाकडे 4.5 लाखांना विकण्यात आलं. तिथेही पीडित तरुणीला 5 ते 6 दिवस ठेवण्यात आलं होतं.
लग्नानंतर आणखी एका लग्नाची ऑफर
त्यानंतर तुळजापूर येथील एजंटने कानडी बुद्रुक इथं एका व्यक्तीकडून साडेचार लाख रुपये घेऊन 1 मार्च 2026 रोजी लग्न लावून दिलं. फक्त एकाच महिन्यात पीडित तरुणीचं तीन ठिकाणी लग्न लावून देण्यात आलं. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. एजंटने फोन करून चौथ लग्न लावून देतो, असं फोन करून सांगितलं. त्यानंतर पीडित तरुणी पुरती खचली. मानसिक छळ आणि या अमानुष प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आष्टी तालुक्यात पीडितेलाा रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे.






