पहूरला भरदिवसा घरफोडी : एक लाख 46 हजारांचा ऐवज लंपास


House burglary in broad daylight in Pahur : Property worth Rs 1.46 lakh looted पहूर (8 मार्च 2026) : पहूरच्या लेलेनगर भागात भरदिवसा घरफोडी झाली असून चोरट्यांनी एका मजुराच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून एकूण एक लाख 46 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पाहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
ताराचंद बाबुलाल भोई (52, रा.लेलेनगर, पहूर ता. जामनेर) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 6 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते घराबाहेर गेले असताना, शनिवार 7 मार्च रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची अंगठी, चांदची कडी, जोडवी, चांदीच्या पट्ट्या आणि 30 हजारांची रोकड मिळून एक लाख 46 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !