धक्कादायक : 30 वर्षीय विवाहितेवर दीरासह सासर्‍याने केला अत्याचार


30-year-old married woman tortured by her father-in-law and sister-in-law अमरावती (8 मार्च 2026) : 30 वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासर्‍याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्काादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात घडला. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी 6 मार्च रोजी गुन्हा दाखल करून आरोपी सासर्‍याला अटक केली तर आरोपी दीर पसार झाला आहे.

काय आहे प्रकरण ?
पीडित महिला ही 30 वर्षांची असून ती मतिमंद आहे. तिचे लग्न तीन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी झाले होते. पीडितेचा पतीदेखील मतिमंद आहे.




पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे (69) आणि तिचा दीर हे दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडितेने आपली आपबिती आईला सांगितली.

पीडितेच्या आईने तत्काळ आपल्या पतीला अर्थात पीडितेच्या वडिलांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी चांदूर रेल्वे ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पिडितेच्या सासर्‍याला पोलिसांनी 6 मार्च रोजी रात्री 11 वाजता अटक केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !