रक्तदानातून स्व.हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन : जैन इरिगेशनमध्ये 319 सहकार्यांचे रक्तदान
जळगाव (9 मार्च 2026) : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडतर्फे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व.हिरालालजी जैन (बाबा) यांच्या 36 व्या स्मृतिदिनानिमित्त कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये आयोजित या उपक्रमात सहकार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण 319 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
यांची होती उपस्थिती
जळगावातील जैन फूड पार्क येथील दवाखान्याच्यावर असलेल्या सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन कंपनीचे वरिष्ठ सहकारी प्रदीप सांखला व सुनील गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्व. हिरालालजी जैन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी किशोर बाविस्कर, जी. आर. पाटील, राजेश आगिवाल, जी. आर. चौधरी आदी सहकारी उपस्थित होते. शिबिराची सुरुवात संजय पारख यांनी पहिले रक्तदान करून केली. त्यानंतर जी. आर. चौधरी, आशुतोष माळी आदींनीही रक्तदान केले. ऍग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क येथील सहकार्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्लास्टिक पार्कमधील ज्ञानालय (डेमो हॉल) येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन डॉ. जनमेजय नेमाडे व राजीव सरोदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सी. एस. नाईक, डॉ. ज्ञानेश पाटील, किशोर बोरसे, किशोर सोनार आदी सहकारी उपस्थित होते. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर प्लांट फॅक्टरी. (टिश्युकल्चर पार्क), जैन फूड मॉल, कांताई नेत्रालय व कांताई सभागृह येथील सहकार्यांनी रक्तदान केले.
जैन प्लास्टिक पार्कमध्ये सर्वाधिक 224 रक्तदाते, तर जैन फूड पार्कमध्ये 60 सहकार्यांनी रक्तदान केले. याशिवाय अलवर प्रकल्पात 2, बडोदा प्रकल्पात 4, उदमलपेठ प्रकल्पात 6, हैद्राबाद प्रकल्पात 10 आणि चित्तूर प्रकल्पात 13 सहकार्यांनी रक्तदान केले. सर्व केंद्रांमधून मिळून एकूण 319 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
या शिबिरासाठी रक्तसंकलनाची जबाबदारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, जळगाव यांच्या वैद्यकीय पथकांनी जबाबदारी निभावली. रक्तसंकलन प्रक्रियेत डॉ. मकरंद वैद्य, भानुदास येवलेकर, सौ. उज्वला पाटील, जयेश पाटील, श्रीकांत मुंडे, रामचंद्र पोतदार यांच्यासह संबंधित संस्थांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले. दरवर्षी स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो.







