भालोद महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
भालोद, ता.यावल (9 मार्च 2026) : महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वास जवळ ठेवावा तर कोणतेही कठीण काम हे यशात रूपांतरित होते, विशेष करून महाविद्यालयातील तरुणींनी आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवावे, ज्या महिला भगिनींनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेले आहे त्या महिला भगिनींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तसेच सुसंस्कारित शिक्षण प्राप्त करून देशाची भावी नागरिक म्हणून समाजाच्या उपयोगी पडावे.
महिला अनेक भूमिकांमध्ये वावरतात आणि समन्वय साधून काम करीत असतात.महिलांनी सर्व क्षेत्रात सहभागी होवून आपले कर्तृत्व सिद्ध करावे आणि नकार देण्याचे धाडस निर्माण करावे. आपल्या कमजोरीला आपल्या क्षमतांमध्ये रुपांतरीत करावे, कमजोरीला अडथळा न समजता त्याला एक आव्हान समजून जिद्दीने कृतीशील राहा, असे प्रतिपादन सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन हेमलता इंगळे यांनी केले.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. प्रस्तावना राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केली. संस्थेच्या चेअरमन हेमलता इंगळे यांना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षांमध्ये महिला चेअरमन म्हणून त्यांची निवड झाल्याने यांना हे सन्मानपत्र देण्यात आले. सन्मान पत्राचे वाचन विद्यार्थिनी हेमांगी इंगळे हिने केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्था चेअरमन हेमलता इंगळे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा.जानवी परतणे, मोहिनी चौधरी, विद्यार्थिनी कोमल तायडे, हेमांगी इंगळे, हेमांगी महाजन, करिष्मा महाजन, राजश्री कोळी, प्रांजल सोनवणे, प्रियंका वसाने, हर्षदा हटकर, साक्षी भिरूड, मेघना भारंबे, धनश्री कोळी, टीना मेघे, भाग्यश्री सनान्से, गायत्री कोळी, पूजा मोरे ,चैताली पाटील, नंदिनी बडगुजर, निवेदिका कोळंबे, पायल महाजन, नम्रता चौधरी, कामिनी भालेराव, गायत्री दिघे, साक्षी चौधरी, राजश्री बर्हाटे या विद्यार्थिनींना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींनी महाविद्यालयात नियमित यावे, महाविद्यालयांमध्ये होणार्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, तसेच महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जिद्दीने आत्मविश्वासाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. कु.कामिनी भालेराव या विद्यार्थिनीने या प्रसंगी आपले कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
सूत्रसंचालन विद्यार्थिनी कोमल तायडे तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी हेमांगी महाजनने मानले. उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ. दिनेश पाटील, प्रा.अजय गायकवाड, प्रा.डॉ. दिनेश महाजन, प्रा.काशीनाथ पाटील, प्रा.डॉ.किरण चौधरी, प्रा.डॉ.वसंतराव पवार, मुबारक तडवी, पंकज नेहेते, तुळशीराम पाटील, किशोर चौधरी, रुपम बेंडाळे, कल्याण चौधरी, बाळकृष्ण चौधरी, आतिकेश माळी, ताराचंद तेली, मुकुंदा महाजन, चंद्रकांत लोखंडे, निलेश सपकाळे आदींनी सहकार्य केले.







