काहुरखेडे जि.प.शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत मातांचा गौरव; तीन स्मार्ट टीव्हीसह डिजिटल वर्ग सुरू


International Women’s Day celebrated with enthusiasm at Kahurkhede Z.P. School काहूरखेडे, ता.भुसावळ (9 मार्च 2026) : निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान गुणवत्ता वाढीसाठी मातांचा सहभाग असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा, काहूरखेडा येथे मातांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत काहुरखेडे यांच्या वतीने शाळेला भेट दिलेल्या तीन स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.

डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व सरपंच गीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्योती सपकाळे, मनीषा पाटील, वैशाली पाटील, ललिता झांबरे तसेच सरपंच गीता पाटील या मातांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमात विद्यार्थिनी गायत्री पाटील व श्रद्धा पाटील यांनी महिला दिनानिमित्त प्रभावी भाषणे केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेमुळे आज महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत उंच भरारी घेत आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी माता सावित्रीबाई, माता जिजाऊ, भारत माता व संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. विविध पोशाखांमुळे कार्यक्रमात रंगत वाढली. यावेळी महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले.

सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव. तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी केले. या उपक्रमामुळे महिलांचा सन्मान होत असल्याने उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !