युद्धाची झळ : घरगुती गॅस सिलिंडर आता 25 दिवसानंतर मिळणार !
Domestic gas cylinder नवी दिल्ली (10 मार्च 2026) : मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आता घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा 25 दिवसानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 21 दिवसानंतर सिलिंडर बुक करता येत होता मात्र आता ही मुदत आणखी चार दिवसांनी अर्थात 25 दिवसांनी करण्यात आली आहे.
आवश्यकता नसताना साठेबाजी
सरकारी सूत्रांनुसार, गेल्या काही काळापासून असे दिसून येत होते की, गरज नसतानाही लोक सिलेंडर बुक करून साठा करत होते. प्रतीक्षा कालावधी 25 दिवस केल्याने अनावश्यक बुकिंगला आळा बसेल. यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना सहजपणे सिलेंडर मिळू शकेल.


पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्या स्थिर राहतील
सरकारी सूत्रांनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सध्या वाढ होण्याची शक्यता नाही. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 130 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जात नाही, तोपर्यंत देशांतर्गत बाजारात किमती स्थिर राहतील. सध्याच्या अंदाजानुसार, कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही
इंधनाच्या पुरवठ्याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की, देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर तेलाची टंचाई नाही. पुरवठा साखळी पूर्णपणे सामान्य आहे. भविष्यातील कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी भारताने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ व्यतिरिक्त इतर मार्गांनी कच्च्या तेलाची खरेदी (सोर्सिंग) वाढवली आहे. यामुळे सागरी मार्गात कोणत्याही तणावाच्या स्थितीत पुरवठ्यात अडथळा येणार नाही.
एव्हिएशन टर्बाइन इंधनाचाही पुरेसा साठा
विमानांमध्ये वापरल्या जाणार्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच टीएफबाबतही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अधिकार्यांनी सांगितले की, देशाकडे टीएफचा पुरेसा साठा आहे आणि घाबरण्याची गरज नाही. भारत केवळ -ढऋ चा उत्पादक नाही, तर तो निर्यातही करतो. त्यामुळे विमान सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.







