रिक्षा अपघातात दोन रिक्षा चालक ठार


ठाणे (10 मार्च 2026) : मुंबई-नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात भीषण अपघातात भिवंडीतील दोन ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.

दोन्ही चालक जागीच ठार
भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजकुमार गुप्ता (40) व महेंद्र केसरवानी (39 वर्षे) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (एम.एच.04 के.3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळे दिशेने जात असताना त्यांची ऑटो रिक्षा मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे जवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली.



वाहनाची धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !