भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !


A minor girl was lured and abducted from Bhusawal city! भुसावळ (11 मार्च 2026) : भुसावळ शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून देण्यात आले. ही घटना सोमवारी, 9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
पीडित 16 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह भुसावळ शहरातील एका भागातील नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आली होती. सोमवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना सात वाजेच्या सुमारास ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कोठेही मिळून आली नाही. तपासादरम्यान असे समोर आले की, संशयित आरोपी अश्विन दीपक सोनवणे (रा. भुसावळ) याने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवून किंवा फुस लावून स्वतःसोबत पळवून नेले आहे. पीडित मुलीच्या आईने या संदर्भात संशय व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली.



मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अश्विन सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल गणेश चौधरी तपास करीत आहेत.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !