जळगावात बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची बांगली लांबवली
Woman’s gold bangle snatched while boarding bus in Jalgaon जळगाव (1 मार्च 2026) : जळगावातील नवीन बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 42 वर्षीय महिलेच्या हातातील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लांबवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
चोपडा तालुक्यातील धनवडीतील रहिवासी लीला जगदीश पाटील (42) या सोमवार, 9 मार्च रोजी जळगाव शहरात आल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या नवीन बसस्थानकावरून चोपडा जाणार्या बसमध्ये (क्र. एम.एच.20 बीएल 1876) चढत होत्या. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने लिलाबाईंच्या हातातील 65 हजार रुपये किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली.









