जळगावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग
Young woman molested in Jalgaon due to one-sided love जळगाव (1 मार्च 2026) : एकतर्फी प्रेमातून एका 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी तरुणाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीने वारंवार लग्नासाठी तगादा लावला शिवाय पाठलाग केला व लग्नास नकार दिल्यास लहान भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
तरुणीचा विनयभंग
जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुली परिसरात 19 वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 8 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पीडीता तांबापूरा परिसरातून जात असतांना संशयित आरोपी सलमान सगीर काकर (रा.पंचशील नगर, जळगाव) हा पीडित तरुणीचा पाठलाग करीत आला व तिला वाटेत त्याने थांबवले.


संशयित आरोपीने पीडितेच्या खांद्यावर हात ठेवून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्याने पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पीडितेने याला विरोध केला असता, आरोपीने तिला गंभीर धमकी दिली. मी तुझे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही. जर तू दुसरीकडे लग्न केले, तर तुला आणि तुझ्या लहान भावाला मी जीवे मारून टाकीन, अशा शब्दांत त्याने पीडितेचा छळ केला.
भेदरलेल्या अवस्थेत पिडीत तरूणीने थेट एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वंजारी करत आहेत.







