एरंडोल तालुका हादरला : चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार


एरंडोल (11 मार्च 2026) : अवघ्या चार वर्षीय बालिकेवर तिच्या 59 वर्षीय संशयीताने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली असून आरोपीच्या अटकेस कठोार कारवाईसाठी जमावाने संतप्त होत रास्ता रोकोही केला.

काय आहे प्रकरण
एका भागातील चार वर्षीय चिमुकली ही दुपारच्या सुमारास घरात आई व भावंडांसह खेळत असताना बालिकेची आई ही नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेल्यानंतर काही मिनिटांनी घरी परतली असता घरात चार वर्षीय चिमुकली ही आढळून न आल्याने तिने तिच्या इतर मुलांसह आजूबाजूला चौकशी केली.



घराशेजारीच राहणारे बालिकेच्या नातेवाईकांकडे बालिकेची आई ही चौकशीसाठी गेली असता त्यांचा घराचा दरवाजा हा अर्धवट स्थितीत लावलेला दिसून आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीदेखील मला माहित नाही, असे सांगितलं. त्याचवेळी संशयित आरोपी मामे आजोबा हे अर्धनग्न अवस्थेत दिसून आला. बालिकेच्या आईला संशय आल्याने तिने घरात जाऊन मुलीचा शोध घेतल्यानंतर चार वर्षीय बालिका ही घरात आढळून आली.

आईने त्या बालिकेला घरी आणलं आणि बालिकेला विचारपूस केली असता. बालिकेने आईला घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली आणि त्याचवेळी बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीवर कारवाईसाठी जमाव संतप्त
एरंडोल पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेत आरोपीला अटक केली तर नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जमाव व नातेवाईक संतप्त झाले. शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ परिसरातील महिला व नागरिक आणि नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली. शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या व पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शंकर पवार हे करत आहेत. पोलिसांनी समन्वय साधल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !