भुसावळातील गटविकास अधिकार्‍यांना शिविगाळ : एकाविरोधात गुन्हा


Group development officers in Bhusawal were verbally abused: A case was registered against one भुसावळ (11 मार्च 2026) : भुसावळ पंचायत समिती कार्यालयात माहिती अधिकार अपिलाच्या सुनावणीदरम्यान गटविकास अधिकार्‍यांना शिविगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
गटविकास अधिकारी दारासिंग गोविंद जाधव (57, रा. सेंट्रल बैंक कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 9 आणि 10 मार्चला दुपारी 12 वाजता पंचायत समिती कार्यालयात माहिती अधिकाराच्या अपिलायी सुनावणी सुरू होती. यावेळी महेंद्र पुष्पाबाई काशिनाथ पाटील (रा.फुलगाव) यांनी कार्यालयात येऊन गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.



संबंधिताने अश्लील शिवीगाळ करत तुम्ही कसे नोकरी करता ते मी पाहतो, अशी धमकी दिली. या गुन्ह्याचा तपास शहरचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !