पाचोरा तालुक्यात खळबळ : झटका मशीनच्या शॉकने एकाचा मृत्यू


Excitement in Pachora taluka: One dies due to shock from shock machine पाचोरा (11 मार्च 2026) : शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या झटका मशीन तारांचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील भोजे येथे सोमवार, 9 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात आरोपी शेतमालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल संतोष पाटील (उभाळे) रा.भोजे, ता.पाचोरा, जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?
पाचोरा तालुक्यातील भोजे शिवारात असलेल्या श्रीकृष्ण धनराज उभाळे यांचे शेत असून त्यांनी आपल्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी ‘झटका मशीन’ लावून त्याद्वारे तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला आहे. अमोल पाटील हा परिसरातून जात असतांना त्याचा स्पर्श झटका मशीनच्या तारांना लागला. या तारांमधील विद्युत प्रवाहामुळे अमोलला जोरदार झटका लागला आणि त्याचा दुदैवी अंत झाला.



या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयताचे वडील संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक श्रीकृष्ण धनराज उभाळे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !