भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्किल बेस डेव्हलपमेंट अंतर्गत स्पेस एव्हिएशन टेक्नॉलॉजी कार्यशाळा
भुसावळ (11 मार्च 2026) : भुसावळातील के. नारखेडे विद्यालयात रोबोटिक लॅब सुरू करण्याचे औचित्य साधून स्किल बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत स्पेस एव्हिएशन व ड्रोन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल मॅडम यांच्या प्रास्तविकाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा हस्ते सत्कार सोहळा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही.पाटील व अनंत एरियल आणि रोबोटिक्स अहमदाबादचे वैज्ञानिक (ट्रेनर) आदित्य लक्ष्मीकांत सावळेश्वरकर, वैष्णवी शिंदे, चिन्मय पारिते हे होते. त्यानंतर विविध ड्रोनची माहिती प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. अनंतम एरियल आणि रोबोटिक्स यांच्यातर्फे कार्यशाळेस आवश्यक असणारे काही महत्त्वाचे कंपोनंट्स विद्यालयास भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांना मी मराठी लोक चळवळ अभियान, मैत्री संस्था व उत्प्रेरक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार 2026 हा पुरस्कार तसेच संकल्प संस्था आयोजित समाजसेविका सिंधुताई सपकाळ समाज रत्न पुरस्कार 2025 , मुंबईहून प्राप्त झालेले हे दोन्ही पुरस्कार संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील साहेब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्याहस्ते या कार्यक्रमानिमित्त देण्यात आले.




संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्या मार्गदर्शनातून तसेच संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विज्ञान शिक्षक नितीन पाटील यांच्या अथक परिश्रमातून रोबोटिक्स लॅब निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयातील हेड क्लर्क मंगेश पाटील यांचे सुपूत्र अभिषेक पाटील यांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन हेमलता जंगले यांनी तर पर्यवेक्षक सुनील पाठक यांनी मान्यवरांचे आभार मानले. अतिथींचा परिचय नितीन पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संगणक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता आठवी नववीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.