अमळनेरात दामिनी पथकाची मोठी कारवाई : चार प्रेमी युगूलांना पकडले


Big action by Damini squad in Amalner : Four lovers arrested अमळनेर (11 मार्च 2026) : अमळनेरात दामिनी पथकाकडून शहरातील विविध भागात गस्त वाढवण्यात आल्याने टारगटांच्या गोटात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यातच पथकाला अमळनेर शहराजवळील अंबाऋषी टेकडी परिसरात प्रेमी युगुलांचा डेरा जमून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाव घेत चार प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले. दाट झाडीमध्ये प्रेम चाळे सुरू असतानाच झालेल्या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेर असलेल्या अंबाऋषी टेकडी परिसरात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेजवळ मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून तेथे ऑक्सिजन पार्क तयार झाले असलेतरी मात्र या दाट झाडीचा गैरफायदा घेत काही प्रेमी युगुल दुपारच्या वेळेत त्या ठिकाणी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.





पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि नम्रता जरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दामिनी पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक कविता ठाणगे, नम्रता जरे, उज्वलकुमार म्हस्के आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने टेकडीवर अचानक धाड टाकली.

दामिनी पथकाने चारही बाजूंनी घेराव घालत चार तरुणी आणि चार तरुणांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आणले. चौकशीत संबंधित तरुण-तरुणी परिसरातील गावांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.

अमळनेर निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना समज देत त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपवले. अमळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत निर्जन स्थळी अशा प्रकारे अश्लील चाळे करणार्‍यांवर दामिनी पथकाची करडी नजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !