सव्वाचार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले : दोन आरोपींना अटक


Drugs worth Rs 4.5 crore seized: Two accused arrested अंबरनाथ (11 मार्च 2026) : तब्बल सव्वाचार कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अंबरनाथमध्ये चरस विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार छापा मारुन पोलिसांनी चरस जप्त केलं. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सव्वाचार कोटी आहे. यातील मुख्य आरोपी हर्षल पटेल हा गुजरातला राहणारा असून गेल्या दीड महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये वास्तव्याला होता. त्याचा दुसरा साथीदार सिराजुद्दीन अहमद याला देखील पोलिसांनी अटक केली. दरम्यान यामागे एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या दोन आरोपीच्या माध्यमातून या टोळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !